३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; दोन्ही सराईत गुन्हेगारांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

  धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील गजानन कॉलनी येथील श्री गजानन महाराज मंदिरातून दानपेटी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, पोलिसांनी अवघ्या सहा तासांत चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले आणि चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

रात्रीच्या अंधारात मंदिरात घुसखोरी

  मंदिरातील दानपेट्यांबरोबरच देवाच्या अंगावरील दागिन्यांवरही चोरट्यांची वक्रदृष्टी असल्याचे अलीकडेच लक्षात येत आहे. अशाच प्रकारे गजानन कॉलनीतील मंदिरात दोन चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात प्रवेश करून दानपेटी चोरली. सकाळी भाविकांच्या निदर्शनास हा प्रकार आला आणि तत्काळ पोलिसांना कळवण्यात आले.

- Advertisement -

गुप्त माहितीवर पोलिसांचा सापळा

  फिर्यादीनंतर चाळीसगाव रोड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अरिहंत मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला. मोटारसायकलवरून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा थरारक पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले.

  अटक केलेल्या आरोपींची नावे साहिल सत्तार शाह आणि सोहेल आरिफ शाह अशी आहेत.


३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

  पोलिस चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून मंदिरातून चोरलेली दानपेटी आणि गुन्ह्यात वापरलेली चोरीची मोटारसायकल असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे दोघे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या चौकशीतून अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

पोलीसांचा इशारा – मंदिरांमध्ये सतर्कता वाढवा

  धुळे शहरात मंदिरातून होणाऱ्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, रात्रीची सुरक्षा वाढवणे आणि नियमित गस्त घालणे या उपाययोजना करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच नागरिकांनीही संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -