धुळे : जामदा शिवारात १३ दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल

  धुळे दर्पण न्यूज :- साक्री तालुक्यातील जामदा शिवार परिसरात सुरत (गुजरात) येथील भंगार व्यापाऱ्याला भंगार विक्रीचे आमिष दाखवून बोलावून मारहाण करत ऐवज व रोख रक्कम लांबविण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात तब्बल १३ दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  सुरत येथील व्यापारी मोहंमद फरिद अय्युब हाश्मी (वय २७) यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून काही व्यक्तींनी भंगार विक्रीबाबत व्यवहार करण्याचे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून हाश्मी व त्यांचे काका मोहंमद इद्रिस मोहंमद सलीम मेमन हे गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जामदा शिवार परिसरात गेले.

  व्यापाऱ्यांचे वाहन थांबल्यानंतर सुमारे १३ जणांच्या टोळीने दोघांना मारहाण केली. त्यांच्याकडील मोबाईल फोन, घड्याळ, रोख रक्कम असा एकूण १ लाख ६९ हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी व्यापाऱ्यांच्या काकांच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये परस्पर ऑनलाईन वर्ग करून घेतले.

- Advertisement -

  या प्रकरणी पोलिसांनी ज्या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये अवतार अशोक भोसले, जय काळा पवार, नामदेव पवार, प्रवीण चव्हाण, आरेश शांतीलाल भोसले, पिंक्या पाटील, पिंकेश कनेश भोसले, भुऱ्या निला भोसले, क्रिश डिस्को, सुऱ्या भुऱ्या भोसले, प्रकाश कनेश भोसले यांचा समावेश आहे. तसेच अजून दोन अज्ञात व्यक्तींनाही आरोपी म्हणून दाखल केले आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर निजामपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -