ही धडक छापेमारी पहाटे साडेसहा वाजता सुरु झाली. लखनऊ, कानपूर व आग्रा येथील वरिष्ठ सीजीएसटी अधिकाऱ्यांनी मोठ्या पोलिस बंदोबस्तासह ही मोहीम राबवली. जवाहरगंज मंडई, महावीरगंज, अकबरपूर, हवेली व सराय खानम या भागात पथके दाखल झाली आणि एकाच वेळी तपासणीला सुरुवात झाली.
![]() |
| - Advertisement - |
विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, व्यापाऱ्यांनी बनावट बिलिंग करून कर टाळण्याचा व शासनाला फसविण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत मागील महिन्यात राज्य जीएसटी विभागाने देखील छापे टाकले होते; मात्र त्या वेळी आरोपी व्यापारी पथकाच्या हाती लागले नव्हते. यावेळी मात्र सकाळी अचानक राबवलेल्या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात यश आले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
ही कारवाई उशिरापर्यंत सुरु होती. अधिकारी आणि पोलिस पथकांनी व्यापाऱ्यांच्या आस्थापनांमध्ये तपासणी करून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. बाजारपेठेत अचानक पोलिस व अधिकाऱ्यांचा तगडा बंदोबस्त पाहून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दिवसभरात अनेक दुकाने बंद राहिली.
![]() |
| - Advertisement - |
मात्र, अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना कोणतीही सविस्तर माहिती उघड केली नाही. “ही जीएसटी चोरी व बनावट बिलिंगशी संबंधित कारवाई असून तपास सुरु आहे,” एवढेच सांगण्यात आले.
जलेसर शहरात गेल्या काही दिवसांपासून कर चुकवेगिरीचे प्रकार वाढत असल्याने विभाग सतत कारवाई करत आहे. अवघ्या २० दिवसांच्या अंतराने झालेल्या सलग धडक छापेमाऱ्यांमुळे व्यापाऱ्यांत मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर मोठे आर्थिक घोटाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
![]() |
| - Advertisement - |




