धुळे दर्पण न्यूज :- धुळे – सोलापूर महामार्गावर आज दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास अक्षरशः थरारक अपघात घडला. शिवाजीनगर, वडीगोद्रीजवळ क्रूझर गाडीचा टायर अचानक फुटल्याने वाहनाचा चालकाचा ताबा सुटला. काही क्षणांतच अनियंत्रित झालेली गाडी महामार्गाचा दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या खोल नालीत कोसळली. या भीषण अपघातात ८ ते ९ जण जखमी झाले असून त्यापैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp
ही क्रूझर गाडी (MH-14 DV-7766) छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा येथील वाद्यवृंद मंडळींना घेऊन बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी निघाली होती. दुपारी वडीगोद्रीजवळील शिवाजीनगर परिसरातून जात असताना पुढील टायर अचानक फुटल्याने वाहनावर चालकाचा ताबा सुटला. अवघ्या काही क्षणांत गाडी उलट बाजूला जाऊन दुभाजक ओलांडत नालीत कोसळली.
![]() |
| - Advertisement - |
अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले. महामार्गावरील वाहनचालकांनीही तत्परतेने सहकार्य केले. समर्थ कारखाना आणि महामार्गावरील रुग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले. जखमींना तातडीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
जखमींची नावे अद्याप जाहीर झालेली नसली तरी, प्राथमिक माहितीनुसार चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन क्रूझर गाडी सुरक्षित स्थळी हलवली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
हा भीषण अपघात पाहण्यासाठी महामार्गावरील प्रवाशांची गर्दी झाली होती. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, "टायर फुटल्यामुळे हा अपघात घडला असून, वाहनाच्या तांत्रिक तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत."
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


.jpg)