या गंभीर स्थितीबाबत माहिती देण्यासाठी असोसिएशनने गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप दत्तात्रय महाले, सेक्रेटरी प्रकाश जानकीराम पांडव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे स्वागत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ यांनी केले.
![]() |
| - Advertisement - |
असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडे ठेकेदारांचे शेकडो कोटी रुपयांचे देयक प्रलंबित आहेत. मात्र, शासन एक रुपयाही देण्यास तयार नाही. उलट बँका, व्यापारी, मजूर, मटेरियल सप्लायर्स यांचा तगादा वाढत आहे. बँकांकडून वाहने, मालमत्ता जप्त केली जात आहेत, CIBIL स्कोर खराब होत आहे, बाजारातील विश्वास संपत चालला आहे.
धुळे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा
याच आर्थिक विवंचनेतून सातारा जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील तरुण अभियंता हर्षल पाटील याने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पाच वर्षांची चिमुकली मुलगी आणि तरुण पत्नी गंभीर अडचणीत सापडले आहेत.
![]() |
| - Advertisement - |
असोसिएशनने स्पष्ट केले की, शासन पेमेंट न दिल्याने मुख्य अभियंत्यांनी कामांना सरसकट मुदतवाढ दिली असली तरी, ठेकेदारांना दंडाच्या नोटिसा देऊन दबाव तंत्र वापरले जात आहे. यामुळे ठेकेदार मानसिक, आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडले आहेत.
अखेर या सर्व समस्यांवर तोडगा न निघाल्याने १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झेंडावंदन केल्यानंतर असोसिएशनमधील अनेक सदस्य सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ आणि बिल्डर्स असोसिएशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा संघर्ष उभारण्यात आला आहे. आता शासनाने तातडीने देयके दिली नाहीत तर १५ ऑगस्ट रोजीचा आत्मदहनाचा इशारा वास्तवात उतरण्याची शक्यता आहे.




