घटना क्रमांक 1 – पीडित विद्यार्थिनीच्या आईचा संताप
शहरातील जिजामाता कन्या छात्रालय येथे घडलेल्या विद्यार्थिनी छळ प्रकरणी गृहपाल हेमांगी शिंदे यांच्यावर पीडित मुलीच्या तक्रारीनंतर धुळे शहर पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात कारवाई लांबल्याचा आरोप करीत पीडित मुलीची आई अनिता सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री जयकुमार रावल यांचे भाषण सुरू असतानाच अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तत्काळ महिला पोलिसांनी धाव घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
![]() |
| - Advertisement - |
घटना क्रमांक 2 – निजामपूर येथील समाधान महाले यांची कारवाईची मागणी
निजामपूर (ता. साक्री) येथील समाधान महाले यांनी पंचायत समितीतील गट विकास अधिकारी व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या सदोष कामकाजाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. दीर्घकाळ न्याय न मिळाल्याने महाले यांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे त्यांचे प्राण वाचले.
घटना क्रमांक 3 – रस्त्याच्या भ्रष्टाचार प्रकरणी कार्यकर्त्याचा संताप
शिरपूर तालुक्यातील भुईटेक ग्रामपंचायतीत काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात तब्बल ४० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल जाधव यांनी केला होता. तत्कालीन सरपंच व रोजगार सेवक यांच्यावर गुन्हा दाखल करून बीडिओची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने आज पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना रोखून ताब्यात घेतले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पोलिसांचा सतर्क हस्तक्षेप
तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी दाखविलेली सतर्कता आणि तात्काळ कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. संबंधितांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान अशा घटना घडल्याने प्रशासनात तसेच नागरिकांमध्येही तीव्र चर्चा रंगली आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


