धुळे दर्पण न्यूज :- मुंबई येथील मंत्रालयातून हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार धुळे जिल्ह्यातील काही भागात पुढील काही तासांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसासोबत मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच जोरदार वाऱ्यांची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
जिल्हा प्रशासनाने या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे वीज कडकडाटाचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे उघड्या मैदानात किंवा झाडांच्या आडोशाला थांबू नये, विजेच्या खांबांपासून व विद्युत उपकरणांपासून दूर राहावे, असे सूचनावजा आवाहन करण्यात आले आहे. तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नाले, ओढे, पूल अशा पाण्याच्या प्रवाहाजवळ नागरिकांनी जाण्याचे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
![]() |
| - Advertisement - |
दरम्यान, धुळे तालुक्यासह शिरपूर, साक्री व शिंदखेडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. शेतकरी वर्गाला पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर असला तरी अचानक होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी अजूनही पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष हवामान विभागाच्या अंदाजाकडे लागलेले आहे.
![]() |
| - Advertisement - |
जिल्हा प्रशासन व हवामान विभागाचा इशारा लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे. विशेषतः ग्रामीण भागात विजांचा कडकडाट जास्त प्रमाणात जाणवत असल्याने शेतकरी व गुराखी बांधवांनी सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असा इशारा देण्यात आला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
👉 नागरिकांनी सतर्कता पाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये व स्थानिक प्रशासनाशी संपर्क ठेवावा, असे आवाहनही मंत्रालय, मुंबई यांच्याकडून करण्यात आले आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |
.jpeg)


