धुळे दर्पण न्यूज :- धुळे तालुक्यासह संपूर्ण खान्देशातील रुग्णांना खात्रीशीर व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळाव्यात या उद्देशाने जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या आण्णासाहेब चुडामण पाटील स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मोराणे प्र.लि., धुळे येथे नेत्रविभागासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविण्यात आली. या यंत्रांचे उद्घाटन चेअरमन तथा माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) करण्यात आले. यावेळी रुग्णांना चष्म्यांचे वाटपही करण्यात आले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
नेत्रविभागासाठी उपलब्ध करून दिलेली यंत्रे ही आधुनिक तंत्रज्ञानाचा नमुना असून रुग्णांच्या निदान आणि उपचार प्रक्रियेत अचूकता आणणारी आहेत. यामध्ये नॉन कॉन्टॅक्ट टोनो मिटर, पेरीमीटर, ओ.सी.टी. स्कॅन मशीन, फंडस फोटो, ग्रीन लेसर, एल. लेसर इनडोअर ऑप्टोमोस्कोप, फेको मशीन, याग लेसर, ए-स्कॅन मशीन, फंडस कॅमेरा अशा महत्त्वपूर्ण उपकरणांचा समावेश आहे. या साधनांच्या मदतीने रुग्णांचे डोळ्यांचे दाब अचूकपणे मोजणे, काचबिंदूचे निदान, डोळ्यांच्या पडद्याचे स्कॅनिंग, रेटिनावरील आजार ओळखणे तसेच लेसरद्वारे उपचार करणे शक्य होणार आहे.
याचबरोबर अस्थिरोग विभागासाठीही मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व ऑर्थोपेडिक टेबल बसविण्यात आले असून या सुविधेमुळे मणक्यांच्या, हाडांच्या किचकट शस्त्रक्रिया, गुडघा व खुब्याच्या सांध्यांचे रोपण अशा मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या रुग्णालयात पार पडत आहेत.
![]() |
| - Advertisement - |
कार्यक्रमात बोलताना माजी आ. कुणाल पाटील म्हणाले, “धुळे व खान्देशातील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी मुंबई, नाशिक, पुणे येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होते. परंतु जवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये सतत अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध करून दिल्याने रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे. खात्रीशीर उपचार मिळाल्याने रुग्णांना समाधान व दिलासा मिळत आहे.”
या उद्घाटनप्रसंगी अधिष्ठाता डॉ. नितीन कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. व्ही. पाटील, नेत्रविभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र वडगावकर, डॉ. शैलेंद्र पाटील, डॉ. मधुकर पवार, डॉ. दिलीप पाटील, डॉ. केतकी भट, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. योगेश झाडबुके, डॉ. मनोज कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
जवाहर मेडिकल फाउंडेशनकडून रुग्णांच्या सेवेसाठी निरंतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू असून, यामुळे धुळे व परिसरातील आरोग्यसेवेत मोठी क्रांती घडून येत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


