धुळे दर्पण न्यूज :- धुळे लोकसभा मतदार संघातील रस्ते व दळणवळणाशी संबंधित अनेक महत्वाच्या प्रलंबित प्रकल्पांना अखेर गती मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी यासाठी हिरवा कंदील दाखवला असून, हे सगळे प्रकल्प खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाले आहेत. या निर्णयामुळे संपूर्ण मतदारसंघातील रस्ते विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असून, यामुळे दळणवळण, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

प्रमुख विकास प्रकल्पांची यादी:

  1. राष्ट्रीय महामार्ग १६० एचवरील बायपास रस्त्यांना मंजुरी
    मालेगाव – कुसुंबा – दोंडाईचा – शहादा या मार्गावर नवीन बायपास रस्त्यांचा समावेश २०२५-२६ च्या वार्षिक योजनेत करण्यात आला आहे.
- Advertisement -
  1. चिंचवार ते लामकानी दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण
    यामुळे वाहतुकीची कोंडी टळणार असून प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

  2. दोंडाईचा ते शहादा दरम्यान चौपदरीकरणास मंजुरी
    या प्रकल्पासाठी लवकरच काम सुरू होणार असून, संपूर्ण भागात वाहतुकीची मोठी सुविधा मिळणार आहे.

  3. तापी नदीवरील टाकरखेडा परिसरात नवीन पूल
    सध्या असलेला पूल नादुरुस्त असल्यामुळे या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.
  1. सोनगीर – दोंडाईचा – नंदुरबार रस्त्याचे चौपदरीकरण
    NH ७५३BB अंतर्गत या मार्गाच्या विस्ताराला देखील मंजुरी देण्यात आली असून, याचा समावेशही वार्षिक योजनेत झाला आहे.

- Advertisement -

धुळे शहरासाठी महत्वाचा निर्णय : ज्योती सिनेमा ते वीर सावरकर पुतळा नवा पूल

ब्रिटिश काळातील पांझरा नदीवरील जुन्या पुलावरून हलकी वाहतूक केली जात असून, त्याच्या कमजोर स्थितीमुळे जड वाहनांना बंदी आहे. पावसाळ्यात तर वीर सावरकर पुतळ्याजवळील लहान पूल पाण्याखाली जातो, ज्यामुळे शहराचा मुख्य संपर्क तुटतो. या समस्येची गांभीर्याने दखल घेत, केंद्र शासनाच्या निधीतून ज्योती सिनेमा ते वीर सावरकर पुतळा मार्गावर नवीन पूल मंजूर करण्यात आला आहे.

या पुलामुळे धुळेकरांना सुरक्षित, वेगवान व अखंड वाहतूकसुविधा मिळणार असून, शहराचा चेहरामोहराच बदलणार आहे.


- Advertisement -

खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचे नियोजनबद्ध कार्य:

यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. शोभा बच्छाव म्हणाल्या की,
“या विकास प्रकल्पांमुळे मतदार संघात मोठा बदल होणार आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने धुळे लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. रस्ते, पूल आणि बायपासच्या माध्यमातून केवळ दळणवळणच नव्हे तर व्यापार, उद्योग, पर्यटन यांनाही चालना मिळणार आहे.”


धुळे लोकसभा मतदारसंघासाठी हे निर्णय ऐतिहासिक ठरणार आहेत. रस्ते विकासाच्या या योजनेला लवकरच प्रत्यक्षात मूर्तरूप दिले जाणार आहे. शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन आणि कामाचे शुभारंभ लवकरच होणार असल्याची माहिती खासदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -