तरुणीचे धर्मांतर करून दुसरा विवाह करणारा पोलिस कॉन्स्टेबल बडतर्फ – धुळे पोलिसांचा कठोर निर्णय
धुळे दर्पण न्यूज :- शहरातील एक धक्कादायक प्रकरणात, तरुणीचे अपहरण करून तिचे धर्मांतर करीत दुसरा विवाह करणारा आझादनगर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल शाकीब कलीम शेख याला अखेर सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) या बडतर्फीचे आदेश जारी केले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
१३ महिन्यांतच दुसरा विवाह
शाकीब शेखचा पहिला विवाह ५ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला होता. केवळ तेरा महिन्यांपूर्वी पहिला विवाह झालेला असताना, त्याने एका तरुणीला पळवून नेले. त्यानंतर ३० डिसेंबर २०२४ रोजी तिचे धर्मांतर करण्यात आले व १ जानेवारी २०२५ रोजी दुसरा विवाह केला.
![]() |
| - Advertisement - |
पत्नीला फसवून पुण्यात माहेरी पाठवले
दुसऱ्या विवाहापूर्वी शाकीबने आपल्या पत्नीला “शिर्डी बंदोबस्तावर जात आहे” असे कारण सांगून पुण्यात माहेरी सोडले. मात्र, प्रत्यक्षात तो संबंधित तरुणीला पळवून घेऊन गेला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर, पहिल्या पत्नीने चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
गुन्हा नोंद, निलंबन आणि चौकशी
या प्रकरणी १४ जानेवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर २ जानेवारी २०२५ रोजी शाकीबला निलंबित करण्यात आले.
- प्रारंभिक चौकशी तत्कालीन पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांनी केली आणि अहवाल वरिष्ठांना सादर केला.
- २८ जानेवारी २०२५ पासून पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी विभागीय चौकशीची जबाबदारी स्वीकारली.
![]() |
| - Advertisement - |
अटक आणि बडतर्फी
घटनेनंतर शाकीब शेख पसार होता. अखेर २४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्याला अटक करण्यात आली. विभागीय चौकशीत तो दोषी ठरला असून, शिस्तभंग व अनैतिक कृत्यांच्या आरोपांमुळे त्याला कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
धुळे पोलिसांच्या या कारवाईमुळे विभागात चर्चा रंगली असून, पोलिस दलात शिस्त व नैतिकतेचे पालन करण्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.



