धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी आमदार फारुक शहा यांनी काही दिवसांपूर्वी एमआयएमला रामराम देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता धुळे जिल्हा आणि शहरातील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे देत एमआयएमशी आपली नाळ तोडली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  जिल्हा, शहर व युवा पातळीवरील प्रमुख पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी महिला जिल्हाध्यक्षा दीपश्री नाईक यांच्या उपस्थितीत आपले राजीनामे सादर केले. यामध्ये जिल्हाध्यक्ष मुख्तार बिल्डर, शहराध्यक्ष फातिमा अन्सारी, युवा अध्यक्ष रफिक पठाण यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, स्वतः जिल्हाध्यक्षा दीपश्री नाईक यांनीही राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

वरिष्ठांकडून दुर्लक्षपदाधिकाऱ्यांची नाराजी

  या सामूहिक राजीनाम्यांमागील कारण स्पष्ट करताना जिल्हाध्यक्षा नाईक म्हणाल्या की,
"जोपर्यंत पक्षात आमदार फारुक शहा होते, तोपर्यंत पक्षाचे काम सुचारूपणे चालले. विकासकामांवर भर देण्यात आला आणि वरिष्ठ पातळीवरही आमची दखल घेतली जात होती. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत शहा यांचा पराभव झाल्यानंतर पक्षाचे नेतृत्वच राहिले नाही. वरिष्ठांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. जनतेच्या समस्या ऐकून घेणारे कोणी नाही. अशा परिस्थितीत पदावर राहणे आम्हाला योग्य वाटत नाही."

  त्यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सुटत नसतील, तर कार्यकर्त्यांवर जनतेचा रोष ओढवतो. त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही पक्षाचे सर्व पद आणि सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा देत आहोत.

राजीनामा देणाऱ्यांची यादी

राजीनामा देणाऱ्यांमध्ये –

  • युवा अध्यक्ष – रफिक पठाण
  • स्टुडन्ट युवा अध्यक्ष – आकीब सय्यद
  • महिला शहराध्यक्ष – फातिमा अन्सारी
  • जिल्हा उपाध्यक्ष – प्यारेलाल पिंजारी, कैसर अहमद, इकबाल शहा
  • शहर कार्यकारी अध्यक्ष – अझहर सय्यद
  • वाहतूक जिल्हाध्यक्ष – माजिद पठाण
  • सचिव – फारुख अन्सारी, सहेजाद मन्सुरी
  • महिला पदाधिकारी – सहेदा अन्सारी, मैमुना अन्सारी, अखिला सय्यद, रेहाना पिंजारी
    यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे महिला जिल्हाध्यक्षा दीपश्री नाईक यांच्याकडे सादर केले.
- Advertisement -

  दरम्यान, जिल्हाध्यक्ष नासिर पठाण हे सध्या बाहेरगावी असून, ते परतल्यानंतर सर्वांचे राजीनामे अधिकृतरीत्या त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

पुढील भूमिका लवकरच स्पष्ट होणार

  या घडामोडीनंतर धुळे एमआयएममध्ये मोठी नेतृत्वशून्यता निर्माण झाली आहे. पदाधिकाऱ्यांनी लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. या सामूहिक राजीनाम्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी एमआयएमच्या संघटनात्मक शक्तीला मोठा धक्का बसणार हे स्पष्ट झाले आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -