सीसीटीव्हीवर स्प्रे मारून चोरट्याचा शक्कल, पहाटेच्या सुमारास घडली धाडसी चोरी

  धुळे दर्पण न्यूज :- साक्री तालुक्यातील दहिवेल येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये रविवारी पहाटे धाडसी चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने केवळ काही मिनिटांत एटीएम फोडून तब्बल १४ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्याने थेट स्प्रे मारला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  ही घटना पहाटे ३:२९ वाजता घडली. प्राथमिक माहितीनुसार, साक्री–पिंपळनेर रस्त्यावरील या एटीएमकडे एक कार थांबली. त्यातून उतरलेला २५ ते ३० वर्षांचा एक युवक एटीएममध्ये शिरला. आत शिरताच त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारला आणि लगेच एटीएमच्या लोखंडी दरवाज्याचा पत्रा कापून मशीन उघडले. त्यातून ₹५०० च्या तब्बल २८०३ नोटा काढून नेण्यात आल्या. दरम्यान, त्याचा साथीदार कारसह थोड्या अंतरावर थांबलेला होता.

- Advertisement -

  घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. धुळे पोलिस मुख्यालयातून ठसेतज्ञ व श्वानपथक देखील दाखल झाले. श्वानाने महामार्गापर्यंत चोरट्यांचा माग काढला; मात्र त्यानंतर सुगावा मिळू शकला नाही. चोरीच्या वेळी कॅमेऱ्यावर चोरटा कैद झाला असून, त्याचे हावभाव व हालचालींच्या आधारे तपास सुरु आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक प्रवीण सुधाकर पाठक यांनी तक्रार दाखल केली असून, त्यावरून साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, श्वानपथकाच्या मदतीने मिळालेल्या सुरागांवरून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

- Advertisement -

  या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एटीएमसारख्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणांहून इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड लंपास झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावून लवकरच या धाडसी चोरीचा पर्दाफाश होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम