धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्हा भाजप रेल्वे प्रवास प्रकोष्ट संयोजक समितीने ताप्ती सेक्शनवरून उधना-जळगाव मार्गे पुणे दरम्यान नवीन प्रवासी रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी केली आहे. ही मागणी तत्काळ मान्य न केल्यास १५ ऑगस्ट रोजी दोंडाईचा, शिंदखेडा आणि नरडाणा या रेल्वे स्थानकांवर तीव्र रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संयोजक सिद्धार्थ सिसोदे व समिती सदस्यांनी दिला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या संदर्भातील निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक तसेच भाजप रेल्वे प्रवास प्रकोष्टचे प्रदेश संयोजक कैलास वर्मा यांना पाठविण्यात आले आहे.
संयोजक सिसोदे यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातून दररोज दोनशे ते तीनशे खासगी बस पुण्याकडे जात असल्या तरी, पश्चिम खान्देशमधून पुण्यासाठी एकही थेट प्रवासी रेल्वेगाडी उपलब्ध नाही. शिक्षण, नोकरी व व्यावसायिक कामकाजासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी पुण्याकडे जातात, मात्र रेल्वे प्रवासाची सुविधा नसल्याने नागरिकांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते.
![]() |
| - Advertisement - |
सहा स्थानके, वाढता प्रवासी ताण
सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा यांसह सहा महत्त्वाची रेल्वे स्थानके येतात. दोंडाईचा हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे, तर शिंदखेडा तालुका व नरडाणा औद्योगिक वसाहत ही रोजगार व उद्योगांसाठी ओळखली जाते. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना रेल्वे सेवेसाठी लांब प्रवास करून शिंदखेडा तालुक्यातील जवळच्या स्थानकांवर यावे लागते.
![]() |
| - Advertisement - |
खान्देश एक्स्प्रेसच्या धर्तीवर नवीन गाडी
संयोजक समितीने उधना-जळगाव-पुणे अशी स्पेशल प्रवासी गाडी १४ ऑगस्टपर्यंत सुरू करण्याची मागणी केली आहे. ही गाडी खान्देश एक्स्प्रेसच्या धर्तीवर असावी, जेणेकरून प्रवाशांना आरामदायी आणि वेळेत प्रवासाची सुविधा मिळेल.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
मागणी मान्य न झाल्यास स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दोंडाईचा, शिंदखेडा आणि नरडाणा स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर रेल रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा समितीने दिला आहे.
यावेळी रमेश सिसोदे, राकेश नेतले, सागर सूर्यवंशी, महेंद्र खैरनार, अंकुश साळुंखे, जगदीश पावार, मयूर सिसोदे, संजय बोरसे यांच्यासह अनेक प्रवासी उपस्थित होते.



