धुळे दर्पण न्यूज :- धुळे-चाळीसगाव दरम्यान चालणाऱ्या लोकल रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी ठाम मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांकडून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सध्या या मार्गावर दिवसातून केवळ चार फेऱ्या सुरू असून, त्या अत्यंत अपुऱ्या असल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या पार्श्वभूमीवर राजेंद्र चौधरी, राजेंद्र चौरे, दीपक सोनवणे, एल.आर. राव, कॉ. पोपटराव चौधरी, प्रा. संभाजी देसले, भास्कर फुलपगारे यांच्यासह अनेकांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ व स्टेशन प्रबंधक, धुळे यांना संयुक्त निवेदन सादर केले. या निवेदनात सद्यस्थितीतील चार फेऱ्यांमध्ये तीन नव्या फेऱ्यांची वाढ करून एकूण सात फेऱ्या सुरु कराव्यात, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे.
![]() |
| - Advertisement - |
प्रवाशांची अडचण गंभीर
धुळे व चाळीसगाव या दोन्ही स्थानकांवरून दररोज अनेक प्रवासी नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, जळगाव, भोपाळ, इटारसी, नागपूर आदी ठिकाणी प्रवास करतात. मात्र धुळे ते चाळीसगाव फक्त मोजक्या फेऱ्यांमुळे हे प्रवासी वेळेत पुढच्या गाड्या पकडू शकत नाहीत. परिणामी, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. काही वेळा प्रवाशांमध्ये गोंधळ व भांडणाच्या घटना देखील घडतात.
रविवारची फेरीही सुरु ठेवण्याची मागणी
निवेदनात रेल्वे प्रशासनाला रविवारची फेरी कायम सुरु ठेवावी, अशीही स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. रविवारच्या दिवशी प्रवाशांची संख्या अधिक असते, मात्र या दिवशी काही वेळा रेल्वे सेवा बंद राहते, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढते.
स्थानिकांसाठी कमी अंतराच्या रेल्वे सुरू करण्याची गरज
सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी असेही स्पष्ट केले की, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये स्थानिकांना जागा मिळत नाही. त्यांना उभ्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे विशेषतः स्थानिकांसाठी कमी अंतरावर धावणाऱ्या गाड्या सुरू कराव्यात, जेणेकरून त्यांचा प्रवास सुलभ, सुरक्षित व तणावमुक्त होईल.
![]() |
| - Advertisement - |
मागणीला संघटनांचा पाठिंबा
या निवेदनावर सुनील पाटील, हरिचंद्र लोंढे, आसिफ शेख, प्रदीप बडगुजर, शरद पाटील, अमोल लिंगायत, विजय वाघ, प्रवीण अमृतकर, अतुल साळुंखे, गौरव पाटील, पवन चौधरी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शविला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी अपेक्षा आता सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



