धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी.) सेवानिवृत्त लिपिक विनायक दामोदर चौधरी यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत आपबिती मांडताना अनेक गंभीर आरोप केले आहेत. साक्री रोडवरील पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत चौधरी यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला.

  विनायक चौधरी हे एस.टी. महामंडळ, धुळे येथून दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून, त्यांनी ३७ वर्षे ४ महिने सेवा बजावली. सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांना हेतुपुरस्कर त्रास देण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

महत्त्वाचे मुद्दे :

१. अनावश्यक कामाची जबाबदारी:
१२ सप्टेंबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार, कोणताही कर्मचारी कमी नसतानाही लेखाशिर्ष ६१४ व ६१५ अंतर्गत प्रवास भत्त्यांचे काम जबरदस्तीने देण्यात आले.

  1. सूडबुद्धीने त्रास:
    प्रवास भत्ता बिलांच्या वर्षभराच्या माहितीसाठी एक दिवसाची मुदत देऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करण्यात आली.

  2. बिना सुनावणी आर्थिक शिक्षा:
    वैद्यकीय रजेवर असताना व्हॉट्सअ‍ॅपवर संक्षिप्त आरोपपत्र पाठवून कोणतीही योग्य चौकशी न करता त्यांच्या पगारातून ६,२२२ रुपये वसूल करण्यात आले.
  3. आरोग्यावर परिणाम:
    सातत्याने होत असलेल्या मानसिक त्रासामुळे प्रकृती बिघडली असून, ३ लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला.
    - Advertisement -

  4. तक्रारींवर दुर्लक्ष:
    विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. उलट तक्रारी फेटाळल्या गेल्या.

  5. सेवानिवृत्तीनंतरही त्रास:
    सेवानिवृत्तीनंतर एप्रिल पगारातून ७५०० रुपये आयकर कपात करण्यात आला, प्रत्यक्षात फॉर्म १६ मध्ये केवळ ७११६ रुपयांचा भरणा दाखविण्यात आला आहे. त्यामुळे ३८४ रुपयांचा अपहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

  6. शिल्लक रजेचा DEO रखडला:
    मे २०२५ पासून शिल्लक रजेबाबत DEO मागणी असूनही अद्याप तो प्राप्त झालेला नाही.

  7. गंभीर इशारा:
    चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर भुषण शिरसाठ व विशाल साळुंखे यांच्यावर IPC कलम १६६, ४०९, ३५५, ४२०, ४७१, ४१८ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही, तर ते १५ ऑगस्ट २०२५ रोजी आत्मदहन करतील.

माध्यमांना भावनिक साद

  पत्रकार परिषदेत बोलताना विनायक चौधरी भावनिक झाले. “मी आपल्यासारखा सामान्य कर्मचारी असून, आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा केली. पण सेवानिवृत्तीनंतरही मला मानसिक व आर्थिक त्रास दिला जात आहे. कृपया माझ्या आवाजाला न्याय मिळवून द्या,” अशी विनंती त्यांनी पत्रकार संघटनेला आणि प्रसारमाध्यमांना केली.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -