धुळे दर्पण न्यूज :- साखरवाडी परिसरातील साक्री रोडवरील सिंधी कॅम्प येथील सदाशिव फुड्स या कुरकुरे व पोंग्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत आज दुपारी एक वाजून पाच मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कच्चा माल आणि तयार माल पूर्णतः जळून खाक झाल्याने हजारों रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार समोर आले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  सदाशिव फुड्सचे मालक आनंद राजकुमार बठीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आग लागल्यानंतर काही मिनिटांतच धुराचे लोट आकाशात उंच उठत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. ही घटना पाहताच नागरिकांनी तातडीने महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला याची माहिती दिली.

  महानगरपालिका अग्निशमन विभागाचे अधिकारी विजय माळी, विनोद थोरात, गोपाल माळी, संतोष शिरसाठ आणि योगेश मराठे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत हजारो लिटर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या सतर्कतेमुळे ही आग जवळपास एक तासात नियंत्रणात आली.

- Advertisement -

  या आगीत कंपनीतील उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल तसेच मोठ्या प्रमाणात तयार उत्पादने जळून खाक झाली आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन यांनी दिली.

  घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली होती. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण होते. सुदैवाने आग लागल्याच्या वेळी कंपनीमध्ये फारशी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नव्हती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या घटनेबाबत उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी योग्य चौकशी करून नुकसानभरपाई व जबाबदारी निश्चित केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
- Advertisement -