धुळे दर्पण न्यूज :- शहराच्या मुख्य रस्त्यांवर आणि चौकाचौकांमध्ये ठाण मांडून उभ्या असलेल्या मोकाट जनावरांमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रस्त्यांवर मुक्त संचार करणाऱ्या या जनावरांमुळे नागरिकांना विशेषतः दुचाकीस्वार, महिला व विद्यार्थ्यांना अत्यंत त्रास सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत अखेर महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  सोमवारपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरात मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेत सोमवारी एकाच दिवशी तब्बल २५ मोकाट गुरांची पकड करण्यात आली असून, त्यांना थेट गोशाळेत रवानगी करण्यात आले आहे.

- Advertisement -

वाहतुकीस अडथळा, नागरिक त्रस्त

  मोकाट गुरांमुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची परिस्थिती निर्माण होत होती. विशेषतः शासकीय कार्यालये, शाळा-कॉलेज, रुग्णालये आणि बाजारपेठा असलेल्या भागांमध्ये जनावरांच्या उपस्थितीमुळे नागरीकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. काही प्रसंगी या जनावरांमुळे अपघातसुद्धा घडले आहेत. 'लोकमत' या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या विशेष बातमीनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि तातडीने कारवाई सुरु केली.

धुळे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा

कानूमाते विसर्जनाची पार्श्वभूमी

  कानूमातेचे विसर्जन सोमवारपासून सुरु झाल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर धार्मिक मिरवणुका निघत आहेत. अशा वेळी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी महापालिकेने ही मोहीम हाती घेतली. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आगाऊ उपाययोजना केल्या आहेत.

- Advertisement -

पशुपालकांना इशारा

  महापालिकेने जनावरांचे मालक व पशुपालकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, गुरे रस्त्यावर सोडल्यास कडक कारवाई करण्यात येईल. जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे नागरिक त्रस्त असून, त्यावर तातडीने उपाय करणे गरजेचे होते.

पुढील उपाययोजना

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने दररोज शहरभर फिरून मोकाट जनावरांवर लक्ष ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत. तसेच, जनावरांचे मालक कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचाही विचार सुरु आहे.

- Advertisement -

 शहरातील स्वच्छता, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अशा प्रकारची मोहीम सातत्याने राबविण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेच्या या पावलाचे नागरिकांनी स्वागत करत, यामध्ये सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -