धुळे दर्पण न्यूज :- मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्याजवळ सोमवारी (२५ ऑगस्ट) सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका कंटेनरला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत कंटेनरमधील तब्बल ३० टन आटा जळून खाक झाला. सुदैवाने चालकाने वेळीच गाडीबाहेर उडी घेतल्याने मोठी जीवितहानी टळली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मध्य प्रदेश येथून कंटेनर (क्रमांक एनएल ०९ एन ९८६२) धावलगिरी (कर्नाटक) येथे आटा घेऊन जात होता. महामार्गावरील देवभाने फाटा नर्सरीजवळ पोहोचल्यावर शॉर्टसर्किटमुळे कंटेनरला आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि केबिनसह कंटेनर ज्वाळांनी वेढले गेले. चालक खालिद खान याने प्रसंगावधान दाखवत गाडीतून उडी घेत स्वतःचा जीव वाचवला.
![]() |
| - Advertisement - |
घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिस तसेच महामार्गावरील टोल नाक्यावरील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत आगीने मोठे बळ घेतले होते. बंदिस्त लोखंडी कंटेनरमधून प्रचंड धूर निघत होता. परिणामी, मालासह कंटेनरचेही मोठे नुकसान झाले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांत हा दुसरा अपघात घडला आहे. यापूर्वी धुळ्याहून इंदूरकडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसला आग लागली होती. त्याच ठिकाणी सोमवारी पुन्हा कंटेनर पेटल्याने महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
![]() |
| - Advertisement - |
स्थानिकांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न झाले असले, तरी ३० टन आटा पूर्णपणे जळून गेला आहे. सोनगीर पोलिसांनी या घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.



