धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सार्वजनिक उत्सवांपैकी एक असलेला गणेशोत्सव आणि मुस्लिम धर्मीयांसाठी महत्त्वाचा असलेला ईद-ए-मिलाद या दोन सणांच्या मिरवणुका एकाच कालावधीत येत असल्याने प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान होते. परंतु, धार्मिक सौहार्द जपत धुळेकर मुस्लिम बांधवांनी प्रशासनाच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत ईद-ए-मिलादची मिरवणूक तीन दिवस पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
२७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात शहरभर मोठ्या मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, मूर्ती विसर्जन सोहळ्यामुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी उसळते. दुसरीकडे, ५ सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधव ईद-ए-मिलाद साजरा करतात. या दोन्ही मिरवणुका एकाच वेळी झाल्यास प्रशासनावर मोठा ताण पडला असता.
![]() |
| - Advertisement - |
यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते व पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सिरात कमिटीचे पदाधिकारी, मुस्लिम धर्मगुरू आणि स्थानिक नेते यामध्ये सहभागी झाले. प्रशासनाने ईद-ए-मिलादची मिरवणूक काही दिवसांनी काढण्याचा प्रस्ताव मांडला.
मुस्लिम बांधवांनी प्रशासनाच्या विनंतीचा मान राखत एकमताने मिरवणूक ८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी सिरात कमिटीच्या सदस्यांचा सार्वजनिक सत्कार करून त्यांचा गौरव केला.
![]() |
| - Advertisement - |
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या, “ईद-ए-मिलादच्या निमित्ताने आपण करुणा, सद्भावना व शांततेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे. हीच खरी आपली सांस्कृतिक परंपरा आहे. भावी पिढ्यांनाही धार्मिक सौहार्दाचे संस्कार व्हावेत, ही आपली जबाबदारी आहे.”
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही मुस्लिम समाजाचे आभार मानले. ते म्हणाले, “उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन दक्ष आहे. कोणीही सोशल मीडियाचा गैरवापर करून अफवा पसरवू नये, गुन्हेगारांचे महिमागान टाळावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.”
धुळेकर मुस्लिम बांधवांचा हा निर्णय केवळ प्रशासनिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरला नाही तर धार्मिक सलोख्याचे दुर्मिळ उदाहरणही ठरला आहे. गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद दोन्ही सण शांततेत व आनंदात पार पडावेत, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
👉 हा प्रसंग धुळ्यातील “विविधतेत एकता” या भारतीय संस्कृतीचा जिवंत पुरावा ठरला आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



