नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा; जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त

  धुळे दर्पण न्यूज :- गणेशोत्सवाच्या काळात धुळे शहर व जिल्ह्यात डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी आदेश जारी केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील दिला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

डीजे आणि लेझर लाईटचा त्रास रोखण्यासाठी निर्णय

  २७ ऑगस्टपासून सुरू होणारा दहा दिवसांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो. अनेक मोठ्या गणेश मंडळांकडून गणरायाच्या स्वागतासाठी आणि विसर्जन मिरवणुकीत डीजे व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

  यामुळे नागरिकांना होणारा ध्वनी व प्रकाशाचा त्रास लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

उत्सवात शिस्तीचे आवाहन

  •  पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, गणेशोत्सवाच्या दहा दिवसांसाठी ही बंदी सक्तीने लागू राहणार आहे.
  •  डीजे किंवा लेझर लाईट वापरणाऱ्या मंडळांवर तातडीने कारवाई करण्यात येईल.
  •  रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
  • धर्मभावना दुखावतील किंवा गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे देखावे व बॅनर्स लावू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
  • सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर पोस्ट प्रसारित करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल.
  • जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त

    "बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, होमगार्ड्स आणि स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  सार्वजनिक गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A. (MCJ))
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -