लळिंग घाटातील घटनेने खळबळ; पाच आरोपी अटकेत, चोरीचा माल आणि कार जप्त
धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरानजीकच्या लळिंग घाटात साधूच्या वेशात लूटमार करणाऱ्या ‘सफेरे’ टोळीला मोहाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पकडले आहे. या प्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
घटना कशी घडली?
२२ ऑगस्ट रोजी दुपारी जळगाव जिल्ह्यातील खाचणे येथील ललिता नरेंद्र पाटील (३८) कुटुंबासह क्रूझर गाडीतून धुळ्याकडे येत होत्या.
लळिंग घाटात रस्त्यावर साधूच्या वेशात काही संशयित उभे असताना वाहनचालकाने गाडी थांबवली.
पाटील कुटुंब तुळजापूर आणि पंढरपूर देवदर्शन करून परत येत असल्याने आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली.
![]() |
| - Advertisement - |
साधूंनी सुरुवातीला पाणी मागितले व आशीर्वाद देण्याचा बहाणा केला.
गाडीतील सर्वजण खाली उतरल्यावर टोळीने कुटुंबातील दोन महिलांना थांबवले व इतरांना गाडीत बसण्यास सांगितले.
याच वेळी एका आरोपीने चाकू काढून सुनंदाबाई व सरलाबाई पाटील यांना धमकावले – “सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा!”
![]() |
| - Advertisement - |
घाबरलेल्या महिलांनी गळ्यातील दागिने काढून दिले. आरोपींनी सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचे दागिने लुटले आणि कारमधून पसार झाले.
मोहाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
घटनेनंतर मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या २४ तासांत आरोपींना जेरबंद करण्यात आले.
अटक आरोपी:
- विक्की मोसमनाथ नाथसफेरे (२५)
- सौदागर बाबुनाथ नाथसफेरे (२४)
- गोविंदनाथ कल्लूनाथ नाथसफेरे (३५)
- जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे (२३)
- क्रांता मौसमनाथ नाथसफेरे (२५)
हे सर्व आरोपी उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
मुद्देमाल जप्त
- लुटलेले दागिने व रोकड
- गुन्ह्यात वापरलेली कार
गुन्ह्यांचा शोध आणि टोळीवर नजर
प्राथमिक चौकशीत आरोपींच्या इतर राज्यांतील हालचालींची माहिती मिळाली असून या टोळीवर आधीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, लुटलेल्या सोन्याचा पुरवठा कुठे केला जाणार होता, याचाही तपास सुरू आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A. (MCJ))
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



