धुळे, दि. २५ ऑगस्ट २०२५ (अमृत पवार यांजकडून)
धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावणारे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक (पी.आय.) ज्ञानेश्वर वारे यांची अलीकडेच झालेली बदली रद्द करावी, अशी ठाम मागणी महानगर नागरी हक्क संघर्ष समितीने केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
आज समितीचे अध्यक्ष श्री. कैलास हजारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख श्री. श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन सादर केले.
![]() |
| - Advertisement - |
समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारे साहेबांनी रुजू झाल्यापासून शहरातील वाहतूक कोंडी व गोंधळ कमी करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली.
बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई,
बंद पडलेले सिग्नल कार्यान्वित करणे,
आग्रारोड व दत्तमंदिर–नगावबारी मार्ग फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मोकळा करणे,
पाचकंदील परिसरातील महिलांना होणाऱ्या छेडछाडीच्या प्रकारांवर आळा घालणे,
अशा अनेक उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता.
निवेदनात म्हटले आहे की, वारे साहेबांच्या बदलीनंतर आग्रारोड व अन्य मार्गावर पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले असून, नागरिक व दुकानदारांना पुन्हा त्रास सहन करावा लागत आहे. चांगले व जनहिताचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करणे हे अन्यायकारक असल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटला आहे.
![]() |
| - Advertisement - |
“चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी प्रशासनाने ठामपणे उभे राहिले पाहिजे. वारे साहेबांची बदली रद्द करून त्यांची पुन्हा धुळे शहरात नियुक्ती करावी,” अशी मागणी समितीने केली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या मागणीला समर्थन देणाऱ्यांमध्ये कैलास हजारे, रमेश पोतदार, दिलीप उपाध्ये, संजय बगदे, चंद्रकांत येशीराव, मिलिंद सोनवणे, राजीव सोनवणे, अशोक तोटे, घननीळ साळुंके, राजेंद्र भामरे, संदीप शेवतकर, बिपीन अमृतकर, अमितकुमार बडगुजर, भगवान वाघ, सुधीर लिमये, सचिन सोनवणे आदींचा समावेश आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



