धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर दहिवद गावाजवळ पोलिस वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पोलिस अंमलदार नवल वसावे यांचा मृत्यू झाला असून दोन अन्य पोलीस अंमलदार जखमी आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  महामार्ग वाहतूक शाखा, शिरपूर यांचे बोलेरो वाहन (क्रमांक MH18 BX 0232) काल नियमित गस्तीसाठी निघाले असताना अचानक वाहनाचा मागील टायर फुटला. नियंत्रण सुटल्याने बोलेरो वाहनाने महामार्गावर पलटी घेतली. नवल वसावे, प्रकाश जाधव आणि अनिल पारधी हे तिघेही गंभीर जखमी झाले.

  अपघातानंतर सर्वांना तातडीने जवळील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, नवल वसावे यांचा शिरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. उर्वरित दोन्ही जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

धुळे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा

  या दुर्दैवी घटनेनंतर शिरपूर पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे. पोलिसांच्या वाहनांचे टायर फुटून असे गंभीर अपघात होणे ही चिंतेची बाब असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. सुरक्षा आणि देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

  दरम्यान, या अपघाताचा सखोल तपास सुरू असून घटनास्थळाचे पंचनामा करून कारणमीमांसा केली जात आहे. पोलिस अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडून मृत पोलिस अंमलदाराच्या कुटुंबीयांना शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

हा अपघात पोलिस दलासाठी आणि स्थानिक नागरिकांसाठीही धक्कादायक ठरला आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -