त्याअंतर्गत शुक्रवारी, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुस्लिम समाज व संविधानप्रेमी बांधवांनी व्यवसाय बंद ठेवावा, असे आवाहन वक्फ समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी व मुख्य समन्वयक डॉ. अब्दुल करीम सालार यांनी केले.
![]() |
| - Advertisement - |
शनिवारी (२० सप्टेंबर) जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या वेळी सुहैल अमीर, सैय्यद अयाज अली, मौलाना मुझम्मील नदवी, डॉ. राघिब जहागीरदार आदींसह समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
तसेच बिगर मुस्लिम बांधवांशी संवाद, धरणे, रॅली आदी संविधानिक मार्गाने शांततेत आंदोलन ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने घेतल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

