महाराष्ट्र निरीक्षण वृत्तपत्र:- जळगाव जिल्ह्यातील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चा एक महत्वाचा पदाधिकारी संजय लोटन पाटील हे रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाले असून स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असून अचानक झालेल्या बेपत्ता प्रकरणाने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे.

Follow the महाराष्ट्र निरीक्षण channel on WhatsApp:

शेवटचे दर्शन आणि नंतरचा अंधार
  संजय पाटील हे मूळचे धरणगाव तालुक्यातील दोनगावचे असून सध्या धुळे येथे वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी ते धुळ्याहून गावी जाण्यासाठी निघाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार ते शेवटचे जळगाव शहरातील एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर ते कोर्ट परिसरातही पाहण्यात आले. पुढे ते जळगाव रेल्वे स्थानकावरून अयोध्यागामी रेल्वेत बसल्याचे आढळून आले. मात्र, त्यानंतर त्यांचा काहीही मागमूस लागलेला नाही. त्यांचे दोन्ही मोबाईलही बंद आहेत.
- Advertisement -


कुटुंबीयांची चिंता, पोलिसांत तक्रार
  संजय पाटील यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा संपर्क तुटल्यामुळे चिंतेतून जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक साधनांचा वापर करून शोध मोहीम राबवली जात आहे.

राजकीय कटकारस्थान की वैयक्तिक कारण?
  या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्यांमुळे ते पक्षासाठी महत्वाचे मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यामागे राजकीय कटकारस्थान तर नाही ना? किंवा पूर्व वैमनस्यामुळे काही काळेबेरे घडले आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेत खळबळ, पोलिसांची कसून चौकशी
  पक्षातील नेत्यांच्या बेपत्ता होण्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला असून संजय पाटील यांचा लवकरात लवकर ठावठिकाणा लागावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  या रहस्यमय बेपत्ता प्रकरणामुळे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


महाराष्ट्र निरीक्षण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : ईमेल : maharashtranireekshana@gmail.com

सर्व सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी...

महाराष्ट्र निरीक्षण

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -