धुळे - माया सिनेविजन आणि 369 प्रॉडक्शन प्रस्तुत ‘खोलतळ’ या मराठी चित्रपटाचे टायटल अनावरण धुळे शहरातील दाते रेजन्सी येथे शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत करण्यात आले.

  यावेळी चित्रपटाचे निर्माता आकाश भामरे, दिग्दर्शक भूषण बिरारी, कास्टिंग डायरेक्टर दीक्षा भोसले, पटकथालेखक जुगल चव्हाण तसेच कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. या प्रसंगी निर्माता व दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या संकल्पनेविषयी माहिती देत सांगितले की ‘खोलतळ’ हा भारतातील पहिला मराठी मल्टीवर्स चित्रपट ठरणार आहे. सस्पेन्स, थ्रिलर आणि केमेस्ट्रीचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एक आगळावेगळा अनुभव देईल.

Follow the महाराष्ट्र निरीक्षण channel on WhatsApp:

  चित्रपटासाठी धुळे, जळगाव आणि नंदुरबार या खानदेशातील जिल्ह्यांत ऑडिशन घेण्यात येणार असून यात स्थानिक कलावंतांना संधी दिली जाईल. याशिवाय हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार तसेच साऊथ इंडियन स्टारकास्टही या चित्रपटात झळकणार आहेत.

  चित्रीकरण नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटनस्थळ तोरणमाळ, महाराष्ट्रातील विविध भाग तसेच साऊथ इंडिया येथे होणार असून साधारण सहा महिन्यांत चित्रपटाची निर्मिती पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक भूषण बिरारी यांच्या कुटुंबीयांनाही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  संपूर्ण युवा टीमच्या बळावर ‘खोलतळ’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर लवकरच सादर होणार असून, मराठी चित्रपटसृष्टीत तो एक नवा टप्पा गाठेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



महाराष्ट्र निरीक्षण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : maharashtranireekshana@gmail.com

सर्व सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी...

महाराष्ट्र निरीक्षण

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -