आज सकाळी गावाजवळील पाण्याच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला नानासिंग पावरा याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक तसेच फॉरेन्सिक तज्ञ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा सुरू करण्यात आला असून घटनास्थळाचा बारकाईने तपास करण्यात आला आहे.
Follow the महाराष्ट्र निरीक्षण channel on WhatsApp:
प्राथमिक चौकशीत असे स्पष्ट झाले आहे की अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने नानासिंग पावरा यांच्या पोटावर, डोक्यावर आणि छातीवर वार करून निर्घृणपणे खून केला आहे. मात्र या खुनामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केल्याची माहिती दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनीही या हत्येमागील कारणाचा लवकर शोध घेऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
दरम्यान, शिरपूर तालुका पोलिसांकडून विविध कोनातून तपास सुरू असून या प्रकरणाचा माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेलाही पाचारण करण्यात आले आहे. लवकरच आरोपी पोलीसांच्या ताब्यात येतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
👉 शिरपूर तालुक्यातील या खळबळजनक खुनामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
![]() |
| - Advertisement - |

