– १४ डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सीसमवेत खेळण्याची सुवर्णसंधी!
धुळे :
राज्यातील फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत “महादेव योजना” राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राज्यभर राबवली जात असून, या योजनेच्या माध्यमातून युवा फुटबॉलपटूंना त्यांच्या खेळातील गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
मा. आयुक्त, क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार राज्यातील १३ वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तर निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यातील सर्वात विशेष बाब म्हणजे, या निवड चाचणीतून निवड होणाऱ्या खेळाडूंना १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथे जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासमवेत खेळण्याची अभूतपूर्व संधी मिळणार आहे.
🏆 धुळे जिल्हा निवड चाचणी वेळापत्रक
| स्तर | दिनांक | वेळ | स्थळ |
|---|---|---|---|
| धुळे जिल्हास्तर | ३० ते ३१ ऑक्टोबर २०२५ | सकाळी १०:०० वा. | जिल्हा क्रीडा संकुल, बाडीभोकर रोड, धुळे |
संपर्क:
श्री. दिपक पाटोल (सहसचिव, धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशन) – 📞 9130157855
श्री. स्वप्निल बोटे (क्रीडा अधिकारी) – 📞 8805522558
📅 विभाग व राज्यस्तर चाचण्या
- विभागस्तर: ३ ते ५ नोव्हेंबर २०२५
- राज्यस्तर: २४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५
(स्थळे पुढील सूचनेनुसार जाहीर करण्यात येतील.)
🎯 पात्रता
- खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत झालेला असावा.
- फक्त पात्र व नोंदणी केलेले खेळाडूच चाचणीत सहभागी होऊ शकतील.
नोंदणीसाठी शेवटची तारीख: २९ ऑक्टोबर २०२५
👉 नोंदणी लिंक येथे आहे
📄 आवश्यक कागदपत्रे
- खेळाडूचे आधार कार्ड (मूळ व २ झेरॉक्स प्रती)
- जन्मदाखला (मूळ व २ झेरॉक्स प्रती)
- शाळेचे आयकार्ड (मूळ व २ झेरॉक्स प्रती)
जिल्हास्तर चाचणीतून निवड झालेल्या खेळाडूंची विभागस्तरावर निवड होईल, त्यानंतर राज्यस्तर निवड होईल. राज्यस्तर चाचणीतून ३० मुले आणि ३० मुलींची अंतिम निवड करण्यात येणार आहे. या निवडलेल्या खेळाडूंना संबंधित यंत्रणेमार्फत ५ वर्षांपर्यंत विशेष प्रशिक्षण आणि सुविधा पुरविण्यात येतील.
धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. मनोहर पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व तरुण फुटबॉलपटूंना आवाहन केले आहे की, “महादेव योजना ही केवळ स्पर्धा नसून फुटबॉल करिअर घडविण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे.”
📰 – महाराष्ट्र निरीक्षण
