धुळे दि. २४: प्रसार माध्यमांवर दूध भेसळीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने मे. जम जम दूध डेअरी, कुंभार टेक, शिरपूर ता. शिरपूर, जि. धुळे येथे तपासणी केली आहे. असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ. कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी श्री. बाविस्कर यांनी २१ ऑक्टोबर, २०२५ रोजी डेअरीला भेट देऊन तपासणी केली. तपासणी दरम्यान उपलब्ध साठ्यातून दोन म्हशीच्या दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले गेले.
त्याचबरोबर डेअरीतील ५४८ लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे. हे नमुने २४ ऑक्टोबर २०२५ रोजी संभाजीनगर येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
अन्न नमुन्यांचे प्रयोगशाळेतील विश्लेषण अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सहायक आयुक्त (अन्न) श्री. कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
महाराष्ट्र निरीक्षण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : maharashtranireekshana@gmail.com
सर्व सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी...
महाराष्ट्र निरीक्षण
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
