धुळे दि.२४: राज्य शासनातर्फे राज्यात आदिवासीच्या कल्याणाच्या/विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना व सामाजिक संस्थांनी भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार" सन २०२५-२६ या वर्षात शासनास प्रस्ताव सादर करण्यासाठी २८ ऑक्टोंबर, २०२५ पर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
राज्यात आदिवासींच्या कल्याणाच्या/विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना व सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या / त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत व्यक्ती व संस्था यांना अनुक्रमे "आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार" हा राज्य पुरस्कार प्रदान करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. या पुरस्कारास भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार असे नामकरण करण्यात आले आहे.
ज्या व्यक्तीं/संस्था यांनी आदिवासी समुदायाच्या कल्याणासाठी/विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. अशा व्यक्ती/संस्थांसाठी प्रकल्प कार्यालयामार्फत २२ ऑक्टोंबर, २०२५ ते २६ ऑक्टोंबर, २०२५ या कालावधीत विहीत नमुन्यातील अर्ज विनामुल्य सुटीचे दिवसासह उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तरी सदर अर्ज/प्रस्ताव २८ ऑक्टोंबर २०२५ अखेर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे कार्यालयास सादर करण्यात यावे, विहीत मुदतीत प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन प्रथमदर्शनी पात्र ठरणाऱ्या व्यक्ती/संस्थांचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात येतील याची नोंद घ्यावी. असे प्रकल्प अधिकारी श्री. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
महाराष्ट्र निरीक्षण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
मुख्य व्यवस्थापक :- सैय्यद मुबश्शिर अली
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : maharashtranireekshana@gmail.com
सर्व सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी...
महाराष्ट्र निरीक्षण
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
