धुळे दि. २४: जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे, जिल्हा परिवीक्षा अधिकारी गिरीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण यांच्या नियोजनानुसार मिशन वात्सल्य मार्गदर्शिकेनुसार ग्राम बाल संरक्षण समित्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
प्रशिक्षण ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान धुळे शहर, धुळे, शिंदखेडा, शिरपूर व साक्री येथे पार पडले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा बाल संरक्षण कक्ष, धुळे आणि सर्वोदय आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्था, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, तहसिलदार नितीन देवरे, गटविकास अधिकारी रमेश देवरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी संगिता पाडवी, वैशाली निकम, पी. आर. पाटील, मनोज जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षणात सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामसेवक (बालविवाह प्रतिबंध अधिकारी) तसेच इतर निमंत्रित सदस्य सहभागी झाले होते.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी धुळे उप विभागीय अधिकारी रोहन कुवर, शिंदखेडा तहसिलदार नितीन देवरे, शिंदखेडा निवासी तहसिलदार श्रीमती बागले, शिंदखेडा गट विकास अधिकारी रमेश देवरे, शिंदखेडा बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती संगिता पाडवी, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प- १ चे श्रीमती वैशाली निकम, शिरपूर बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प २ चे श्रीमती पी आर पाटील, प्रशिक्षणाच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी साक्री सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ. राजेंद्र के देवरे, साक्री बाल विकास प्रकल्प अधिकारी मनोज जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी पिंपळनेर प्रकल्प तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे, जिल्हा परिवीक्षा अधिकारी गिरीश जाधव, सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती मनीषा पिंपळे, श्रीमती उषा साळुंखे अध्यक्ष बाल कल्याण समिती, बाल कल्याण समिती सदस्य श्रीमती सुरेखा पवार, परीवीक्षा अधिकारी श्रीमती अर्चना पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिश चव्हाण, राज्य समन्वयक एसबीसी-३ चे नंदू जाधव, अतुल बिन्हाडे, श्रीकांत भोरे, चेतन पाटील, सचिव देवेंद्र पाटील, विकास गिरासे, अँड. राहुल वाघ इ. प्रशिक्षणात सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामसेवक (बालविवाह प्रतिबंध अधिकारी) तसेच इतर निमंत्रित सदस्य सहभागी झाले होते.
प्रशिक्षणादरम्यान बालकांचे हक्क, कायदे, बाल शोषण प्रतिबंध, पुनर्वसन व पुनएकात्मता, तसेच ग्रामस्तरावरील बाल संरक्षण समितींच्या जबाबदाऱ्या या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत बाल न्याय अधिनियम २०१५, बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६, लैंगिक गुन्हापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२, बाल कामगार प्रतिबंध कायदा (१९८६, सुधारित २०१६), कौटुंबिक हिंसाचार अधिनियम, दत्तक विधान प्रक्रिया, चाईल्ड लाईन १०९८ जनजागृती, आणि किशोरवयीन जीवन कौशल्य प्रशिक्षण या विषयांचा समावेश होता.
कार्यशाळेसाठी मार्गदर्शन विकास गिरासे, अतुल बिराडे, राहुल वाघ, अॅड. रोहिणी महाजन, तृप्ती पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवेंद्र पाटील, दीपक रंधे आणि चाईल्ड लाईनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी मान्यवरांनी सहभार्गीचे अभिनंदन करताना सांगितले की, "बालकांचे संरक्षण ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. "असा संदेश दिला आहे. असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र निरीक्षण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
मुख्य व्यवस्थापक :- सैय्यद मुबश्शिर अली
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : maharashtranireekshana@gmail.com
सर्व सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी...
महाराष्ट्र निरीक्षण
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
