बारामती विमानतळावर आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे सुरक्षा कर्मचारी प्रवास करत असलेले छोटे विमान शेतात कोसळल्याची घटना घडली आहे.
अपघातस्थळी मोठी आग लागून धुराचे लोट पसरल्याचे दृश्य असून संपूर्ण विमान जळून खाक झाल्याची माहिती प्राथमिक दृश्यांतून समोर आली आहे.
विमानातील सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिकृत तपशील येणे बाकी असून बचावकार्य तत्काळ सुरू करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी बारामतीकडे जात असताना हा अपघात घडल्याचे वृत्त असून घटनेच्या कारणांचा तपास संबंधित यंत्रणा करत आहेत.
या घटनेबाबत राज्य सरकारकडून अधिकृत निवेदन व पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
