महाराष्ट्र निरीक्षण | धुळे



   महाराष्ट्र निरीक्षण:- धुळे शहरातील गुरुद्वारा परिसरात शीख धर्मीय बांधवांच्या दोन गटांत झालेल्या भीषण हाणामारीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत लाठ्याकाठ्या, तलवारींचा वापर झाला असून गोळीबारही झाल्याची माहिती आहे.

धुळे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा

या राड्याचे कारण गुरुद्वाराच्या गादीवरून सुरू असलेला वाद असल्याचे समोर आले आहे. बाबा धीरज सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना उत्तराधिकारी नेमण्याची मागणी स्थानिक शीख बांधवांनी केली होती.

दरम्यान, पंजाब येथून आलेल्या शीख धर्मीय समितीने बाबा रणवीर सिंग यांची नियुक्ती केल्यानंतर स्थानिक शीख समाजात तीव्र नाराजी पसरली होती. याच वादातून दोन गट आमनेसामने आले आणि परिस्थिती हिंसक वळणावर गेली.

Follow the महाराष्ट्र निरीक्षण channel on WhatsApp:

घटनेदरम्यान दगडफेकही झाल्याची माहिती असून, गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

उद्या गुरुगोविंद सिंग जयंती साजरी होणार असतानाच ही घटना घडल्याने पोलिसांनी गुरुद्वारा परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

महाराष्ट्र निरीक्षण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : maharashtranireekshana@gmail.com