धुळे  : वडजाई रोड परिसरात अकबर ओवीसी यांच्या जाहीर सभेदरम्यान ‘महाराष्ट्र निरीक्षण’चे मुख्य संपादक, पत्रक मालक, मुद्रक व प्रकाशक यांना पोलिसांनी सभा स्थळी प्रवेश देण्यास नकार दिल्याची घटना घडली.

पत्रकाराने ओळखपत्र सादर करूनही प्रवेश नाकारण्यात आल्याचे व “तुमची डिग्री काय आहे?”, “तुमचा पेपर ओरिजनल आहे का?”, “हे पेपर घरी ठेवा”, “आमच्याकडे वेळ नाही” अशी विधाने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“आमच्या पोलिस ठाण्यात येऊन परवानगी घ्यायला हवी होती” असे सांगत सभास्थळी थांबण्यास मनाई करण्यात आली, तसेच “सभा संपल्यानंतर पोलिस ठाण्यात या” असे निर्देश देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले.

पत्रकार असल्याची ओळख मान्य न करता परवानगी न दिल्यामुळे प्रसारमाध्यमांच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे ‘महाराष्ट्र निरीक्षण’ने स्पष्ट केले आहे.

या वृत्तात कोणताही आरोप न करता केवळ घडलेली घटना वाचकांसमोर मांडली जात आहे, मात्र कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली माहिती संकलनात अडथळे येत असतील तर त्याची दखल घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.