धुळे दर्पण न्यूज:- धुळे: इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव ईद-ए-मिलाद धुळे शहरात जोरदार उत्साहात साजरा करण्यात आला. मच्छी बाजार परिसरातून मुस्लिम बांधवांनी भव्य जुलूस काढला, ज्यात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
या मिरवणुकीत आमदार फारुक शाह, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्यासह अनेक मुस्लिम धर्मगुरू उपस्थित होते.
उत्सवाच्या वातावरणात, नागरिकांनी एकत्र येऊन शांततेत आणि सौहार्दाने साजरा केलेल्या या कार्यक्रमाने शहरात धार्मिक एकता आणि भाईचारा दर्शवला. मिरवणुकीच्या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी हजरत मुहम्मद यांच्या शिकवणीचे महत्त्व स्पष्ट केले.
धुळे शहरात या मिरवणुकीने एक आनंददायी वातावरण निर्माण केले आहे.

