दोंडाईचा, प्रतिनिधी रईस शेख
दोंडाईचा, स्थानिक आयशा प्री. प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे ९वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्यात नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांनी सादर केलेल्या नृत्य, अभिनय, गाणी आणि नाटिकांनी पालक व पाहुण्यांची मने भारावून टाकली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आजम मार्चंट, हाजी सुलतान, रवि जाधव, रवि उपाध्ये, मुनाफ भाई मंजुम पठाण, जावीद बागवान, डॉ. मोहसीन यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष पाहुणे म्हणून शाळेचे पालक तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. पालकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका तनझीम मॅडम यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या वाढत्या कलागुणांचे कौतुक केले. त्यांनी शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांबद्दल माहिती देत पालक व विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद वाहीद सर यांनी केले, तर शाळेच्या शिक्षिका मुबशेरा मॅडम व इतर शिक्षकवृंदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. शाळेचे चेअरमन अजमल सिकलीगर यांनी उपस्थित मान्यवर, पालक व शिक्षकांचे आभार मानले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या चमकदार सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह आनंदी वातावरणाने भारले गेले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी उत्साहात पारितोषिक वितरण सोहळा व ग्रुप फोटोसेशनचा आनंद घेतला.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |

