Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
फसवणुकीचा कट – विश्वास संपादन करून गुंतवणूकदारांना दिले आमिष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याराम भुराराम पटेल (वय ३७, रा. वक्रतुंड अपार्टमेंट, पारोळा रोड, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार समोर आला आहे. १९ एप्रिल २०२४ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली.
![]() |
| - Advertisement - |
१५ टक्के महिन्याला नफा देण्याचे गाजर दाखवले
अंकुर जैन आणि त्याची पत्नी दिव्या जैन (रा. जैन धर्मशाळेजवळ, खापर, जि. नंदुरबार) यांनी फिर्यादीसह इतर गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर १५ टक्के दरमहा नफा देण्याचे आमिष दिले. त्यासाठी खात्री मिळावी म्हणून त्यांनी ‘दिव्यअंकुर कन्सल्टन्सी’चे चेक दिले, जे पुढे वटले नाहीत.
या आमिषाला भुलून फिर्यादी ७५ लाख रुपये रोख व ५९ लाख रुपये चेकद्वारे, असे एकूण १ कोटी ३४ लाख रुपये या आरोपी दाम्पत्याला देण्यात आले. मात्र, यातील फक्त ४ लाख रुपये नफ्याच्या स्वरूपात गुंतवणूकदारांना परत मिळाले. उर्वरित १ कोटी ३० लाख रुपये आणि ठरल्याप्रमाणे १५ टक्के नफा न देता, आरोपी पती-पत्नी पसार झाले.
पोलिसांकडून तपास सुरू – नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
या प्रकरणी आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि अपहार यासंबंधी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार करीत आहेत.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
फसवणुकीनंतर आरोपी अंकुर जैन आणि त्याची पत्नी दिव्या जैन हे फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी नागरिकांना मोठ्या आर्थिक गुंतवणुकीपूर्वी योग्य तपासणी करून, अधिकृत व विश्वासार्ह मार्गांनी व्यवहार करण्याचा सल्ला दिला आहे.
या प्रकारामुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बँकेतून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनी अशा घटनांपासून सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


