धुळे दर्पण न्यूज :- धुळे तालुक्यातील नेर येथे असलेल्या यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थीनी प्रवज्या राजेश सोनवणे हिने नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत यश मिळवत नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला आहे. तिच्या या मोठ्या यशामुळे तिच्या कुटुंबासह संपूर्ण शाळेचा गौरव वाढला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
प्रवज्या ही अतिशय हुशार व मेहनती विद्यार्थीनी असून तिने आपल्या चिकाटीच्या जोरावर नवोदय विद्यालयाच्या निवड परीक्षेत यश संपादन केले आहे. तिच्या यशामागे तिच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि तिच्या स्वतःच्या अथक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. विशेषतः तिच्या वर्गशिक्षिका सुलभा मोरे यांनी तिला योग्य त्या मार्गदर्शनाने पुढे जाण्यास मदत केली.
![]() |
| - Advertisement - |
संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडावे, यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते. प्रवज्या हिचे यश ही शाळेच्या या प्रयत्नांची पावती आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या यशामुळे प्रेरणा घेऊन भविष्यात इतर विद्यार्थीही अशाच प्रकारे मेहनत करून मोठे यश मिळवतील, असा विश्वास शाळेच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रवज्या हिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


