धुळे दर्पण न्यूज :- गौणखनिज वाहतुकीच्या प्रकरणात पकडलेल्या ट्रॅक्टरवरील दंडाची रक्कम कमी करण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक अधिकारी दिनेश सूर्यभान वाघ यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) उपविभागीय कार्यालयात सापळा रचून केली. या प्रकरणी वाघ यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
काय आहे प्रकरण?
तक्रारदार यांच्या चुलत भावाचा गौणखनिज वाहतुकीचा व्यवसाय असून, त्यांचे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या भरारी पथकाने २४ फेब्रुवारी २०२५ रोजी कोकले (ता. साक्री) शिवारात पकडले होते. यानंतर पंचनामा करून ट्रॅक्टर साक्री तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आला. पुढील कारवाईसाठी तहसीलदारांनी अहवाल धुळे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयाकडे पाठवला.
![]() |
| - Advertisement - |
एसीबीच्या पथकाची कारवाई
तक्रारदाराने महसूल सहाय्यकाच्या लाच मागणीविरोधात ७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) धुळे कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर ७ आणि १० मार्च रोजी एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली. यावेळी दिनेश वाघ यांनी तडजोडीअंती १३ हजार रुपये लाच घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले.
त्याअनुसार, १० मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताच महसूल सहाय्यक दिनेश वाघ यांना रंगेहात अटक करण्यात आली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
गुन्हा दाखल
या प्रकरणी दिनेश वाघ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई?
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्यासह राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर या अधिकाऱ्यांनी केली.
![]() |
| - Advertisement - |
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास एसीबीच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा स्थानिक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


