धुळे दर्पण न्यूज :- दोंडाईचा शहरातील धुळे चौफुलीवर, मोहमंदिया नगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत, गरीब नवाज कॉलनीच्या शेजारी आणि कनोरी नाल्यालगत असलेल्या फारूख हाजी पिंजारी यांच्या भंगार गोडाऊनला काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. ही आग रात्री अंदाजे दोन ते अडीचच्या दरम्यान लागल्याची माहिती असून, यामध्ये लाखों रुपयांचे प्लास्टिक व इतर साहित्य जळून खाक झाले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही आग येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दल व पोलीस यंत्रणेला याबाबत माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अखेर पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
![]() |
| - Advertisement - |
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीही गोडाऊनमधील भंगार साहित्य, प्लास्टिकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे गरीब नवाज कॉलनी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीचा प्रसार अधिक वेगाने झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
दोंडाईचा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली असून, उशिरापर्यंत अधिकाऱ्यांकडून अग्नी उपद्रवाबाबतची चौकशी सुरू होती.
स्थानिक प्रशासनाकडून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मदत मिळावी व अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, उन्हाळ्यातील अशा दुर्घटनांकडे प्रशासनाने अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


