धुळे दर्पण न्यूज :- शहरातील सुलतानिया नगरमधील सुलतानिया मदरशामध्ये विनापरवानगी पहाटेपर्यंत लाऊडस्पिकर वापरण्यात आल्याच्या प्रकरणी मदरशाच्या विश्वस्ताविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९ एप्रिलच्या रात्री घडला असून, लाऊडस्पिकरची परवानगी नसतानाही तो पहाटेपर्यंत सुरु ठेवण्यात आला होता.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानिया मदरशात १९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता लाऊडस्पिकर सुरु करण्यात आला होता. मात्र, परवानगी नसतानाही हा लाऊडस्पिकर २० एप्रिल रोजी पहाटे ३ वाजून १३ मिनिटांपर्यंत सुरु होता. विशेष म्हणजे, नियमांनुसार रात्री १० वाजेपर्यंतच लाऊडस्पिकर वाजवण्यास परवानगी आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.
![]() |
| - Advertisement - |
या घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल शरद साहेबराव जाधव यांनी सायंकाळी सव्वा सात वाजता चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सुलतानिया मदरशाचे विश्वस्त महम्मद फैसल शकील अहमद (रा. रातराणी हॉटेलजवळ, नंदी रोड, धुळे) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ आणि मुंबई पोलीस कायदा कलम १३१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. पी. पाथरवट करत आहेत. या प्रकारामुळे परिसरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे. नागरिकांनी अशा घटनांबाबत सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


