धुळे दर्पण न्यूज :- धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला अनोखे अभिवादन करत, भीमनगर साक्री रोड येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी १० लाख रुपयांचा खासदार निधी मंजूर केला आहे. या कामाच्या भूमिपूजनाचा विधी सुद्धा याच दिवशी पार पडला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी महामानव डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान, सामाजिक समतेसाठी केलेला संघर्ष आणि परिवर्तनकारी कार्याची आठवण करून दिली. “समता, बंधुता आणि न्याय हीच खरी डॉ. आंबेडकर यांना मानवंदना आहे,” असे त्यांनी सांगितले.
![]() |
| - Advertisement - |
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, कुसुमताई शिरसाठ, धनराज शिरसाठ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी ईस्माईल पठाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीतराजे भोसले, डॉ. दिनेश बच्छाव आदी मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत, त्यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण म्हणजेच सामाजिक परिवर्तनाचा आदर्श जपण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट चित्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळाले.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


