धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील पाटूर नगरपरिषद इमारतीवर उर्दू भाषेतील फलक असण्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यासोबतच न्यायालयाने एक स्पष्ट आणि महत्वपूर्ण संदेश दिला आहे – "उर्दू ही भारतातीलच भाषा आहे, परकी नाही."
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
ही याचिका पाटूर येथील माजी नगरसेविका वर्षाताई यांनी दाखल केली होती. त्यात त्यांनी नगरपरिषदेच्या नावफलकावर मराठीसोबत उर्दू भाषेचा वापर का केला जातो, असा सवाल उपस्थित केला होता.
मंगळवारी न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करत ती फेटाळून लावली. न्यायालयाने नमूद केले की, "भाषा कोणत्याही धर्माची नसते. ती समाजाची, प्रदेशाची आणि लोकांची असते."
![]() |
| - Advertisement - |
* "भाषा म्हणजे संस्कृती. ती एका समाजाच्या आणि त्याच्या प्रगतिचा आरसा आहे. उर्दू ही गंगा-जमुनी तहजीब म्हणजेच हिंदुस्तानी संस्कृतीचं सुंदर उदाहरण आहे."
* "उर्दू ही परकी आहे, असा समज चुकीचा आहे. उर्दू देखील मराठी व हिंदीसारखीच एक इंडो-आर्यन भाषा असून ती भारतातच जन्मलेली आहे."
* "उर्दू भाषेने अनेक प्रसिद्ध कवींच्या लेखणीला समृद्ध केलं आहे. आजही हिंदीमध्ये उर्दू शब्दांशिवाय संवाद होणं कठीण आहे. 'हिंदी' हा शब्द देखील फारसी शब्द 'हिंदवी' पासून आलेला आहे."
* "ब्रिटिशांनी हिंदी व उर्दू भाषांमध्ये धार्मिक भेद निर्माण केला. त्यामुळे हिंदी ही हिंदूंची आणि उर्दू ही मुस्लिमांची भाषा मानली जाऊ लागली, जी वस्तुस्थितीपासून खूपच दूर आहे."
* "भाषा ही वैचारिक देवाणघेवाणीसाठीच असते. ती विभाजनासाठी नाही, तर लोकांना एकत्र आणण्यासाठी असावी."
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
न्यायालयाचे कवितेच्या माध्यमातून भाष्य:
"उर्दू जर स्वतः बोलू शकली असती, तर ती म्हणाली असती:
'उर्दू है मेरा नाम, मैं ‘ख़ुसरो’ की पहेली हूं,
मुझे अपने मज़हब से मत जोड़ो,
मैंने खुद को कभी मुसलमान नहीं माना,
मैंने भी अच्छे दिन देखे हैं,
आज अपने ही वतन में अजनबी हूं...'."
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने देशातील भाषिक विविधतेबाबत एक सकारात्मक आणि उदारमतवादी दृष्टिकोन साकारला आहे. न्यायालयाने स्पष्ट केलं की नगरपरिषदेकडून उर्दूचा वापर स्थानिक नागरिकांच्या समजुतीसाठी आणि सेवेसाठी करण्यात आला आहे, आणि त्यात काहीही चुकीचं नाही.
"उर्दूसोबत मैत्री करा, प्रत्येक भाषेसोबत आपुलकी ठेवा – कारण आपल्या विविधतेतच आपली खरी ताकद आहे," असा संदेश देत न्यायालयाने या प्रकरणावर अंतिम शिक्कामोर्तब केलं.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


