धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी ‘लाडकी बहिण योजना’वरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात फक्त ५०० रुपयेच दिले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
'लाडकी बहिणींशी थट्टा, विश्वासघात केला'
पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, "महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, परंतु आता केवळ ५०० रुपये दिले जात आहेत. हे महिलांच्या आशावादाशी, त्यांच्या स्वाभिमानाशी आणि त्यांच्या हक्कांशी खेळ करण्यासारखे आहे. हे थेट विश्वासघात आहे."
![]() |
| - Advertisement - |
पटोले पुढे म्हणाले की, सरकार आता म्हणत आहे की लाडकी बहिणींना पैसे दिले, त्यामुळे विकासासाठी निधी उरलेला नाही. "हे स्पष्ट दाखवते की ही योजना केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरली गेली होती. बिहारसह इतर ठिकाणीही असाच खेळ केला जात आहे. महिलांची फसवणूक करून, विकास थांबवला जातोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
'शेतकऱ्यांशीही केला आहे विश्वासघात'
त्याचबरोबर काँग्रेसने भाजप सरकारवर शेतकऱ्यांशी धोका केल्याचाही आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून ते उत्पादन खर्चाच्या भावांपर्यंत सरकारने केलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
ईडीच्या नोटिशीवरूनही संताप
यावेळी बोलताना नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना दिलेल्या ईडीच्या नोटिशीवरही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, "हे सगळं राजकीय सूडबुद्धीतून घडतंय. सरकारकडून विरोधकांना दडपण्यासाठी केंद्रीय संस्थांचा गैरवापर केला जातो."
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


