धुळे दर्पण न्यूज :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र मंगळ कलश यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले असून ही यात्रा रविवार, दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता बेटावद येथून शुभारंभ करणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे यांनी दिली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, सुमित पवार, कुणाल पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
बेटावद येथून सुरू होणारी ही कलश यात्रा नरडाणा मार्गे शिंदखेडा येथे पोहोचेल, जिथे उत्साहात स्वागत होईल. त्यानंतर दोंडाईचा येथेही यात्रेचे स्वागत करण्यात येईल. पुढे ही यात्रा सारंगखेडा येथील दर्शन घेऊन दुपारी तीन वाजता नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करेल. उत्तरकाशी प्रकाशा येथे यात्रेचे भव्य स्वागत होणार आहे.
शहिद व क्रांती स्मारकास मानवंदना
या यात्रेचा ऐतिहासिक आणि देशभक्तीपूर्ण बाजू लक्षात घेत शहिद शिरीषकुमार यांच्या स्मारकास मान वंदना करण्यात येणार आहे. तसेच, संध्याकाळी ५.३० वाजता चिमठाणे येथील क्रांती स्मारकाजवळ मानवंदना देण्यात येईल.
धुळे शहरात यात्रा मुक्कामी
या भव्य यात्रेचे आगमन सायंकाळी ७ वाजता धुळे शहरात होईल. खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा मातेचे दर्शन घेतल्यानंतर यात्रा येथे मुक्कामी थांबेल.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
२९ एप्रिल – नाशिक जिल्ह्यात प्रवेश
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, २९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता लळींग किल्ला येथे दर्शन होईल, त्यानंतर ९ वाजता रोकडोबा हनुमान मंदिरात पूजा व दर्शन घेण्यात येईल. पुढे ही यात्रा १० वाजता झोडगेमार्गे नाशिक जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या यात्रेमुळे धर्मभावना, एकात्मता आणि सांस्कृतिक वारशाची जपणूक होणार असून, स्थानिक पातळीवर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने ही यात्रा पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
— सैय्यद सानिल
धुळे दर्पण न्यूज
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


