धुळे दर्पण न्यूज :- शहरातील विटाभट्टी परिसरात दोन गटांमध्ये जुना वाद उफाळून आल्याने मोठा गोंधळ उडाला. या वादातून एक गट आक्रमक होत, ५० वर्षीय महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  मिळालेल्या माहितीनुसार, गुलबदन फरीद पठाण, गजाला रियाज शेख, शकिला आरिफ पठाण, सलमान फरीद पठाण व इम्रान फरीद पठाण या व्यक्तींनी मिळून वादाच्या दरम्यान एका पन्नास वर्षीय महिलेशी हुज्जत घालत तिच्यावर हात उचलला. "विरोधी गटातील अशफाक खाटीक यांच्याशी वादाला तुम्हीच कारणीभूत आहात," असा आरोप करत महिलेला मारहाण करण्यात आली.


  या प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून देवपूर पोलिसांनी गुलबदन पठाण व इतर चार जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास देवपूर पोलीस करत आहेत.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -