धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन हद्दीतील एका घरफोडी प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठे यश मिळवले आहे. एलसीबीच्या पथकाने अट्टल घरफोड्याला अटक करून जवळपास ९६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच त्याचा एक साथीदार अद्याप फरार असून, पोलीस त्याच्या शोधात आहेत.
![]() |
| - Advertisement - |
ही घटना चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एलसीबीच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान एलसीबी पीआय श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी रिहान उर्फ पोपण्या फरीद पठाण (वय १९, रा. अंबिका नगर, धुळे) याला ताब्यात घेतले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
सुरुवातीला चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने फैजान मुजमील अन्सारी (वय २५, रा. हाजीनगर, इसार मशीद जवळ, धुळे) याच्या मदतीने घरफोडी केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख मिळून एकूण ९६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फैजान अन्सारी सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलीस तपास पथक सतत प्रयत्न करत आहे. या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शन लाभले, तर पीआय श्रीराम पवार, पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, हे.कॉ. प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पोलिसांकडून आवाहन
धुळे शहरात अशा घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. नागरिकांनीही आपल्या घरांमध्ये सुरक्षेची योग्य ती व्यवस्था ठेवावी, जसे की सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल लॉक, अलार्म सिस्टम्स, जेणेकरून अशा घटनांना आळा घालता येईल. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


