धुळे दर्पण न्यूज :- महावितरणच्या भरारी पथकांनी मंगळवारी धुळे शहरातील वडजाई रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर वीजचोरी प्रकरणांवर धडक कारवाई केली. राज्यातील विविध भागांमधून आलेल्या १६ भरारी पथकांनी एकाच वेळी संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईत ३५ ते ४० औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनी वीजचोरी केल्याचे आढळून आले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  वडजाई रोड परिसरातील एकूण दीडशे औद्योगिक आणि व्यावसायिक ठिकाणी तपासणी करण्यात आली. या तपासणीत वीजचोरी करणाऱ्यांकडून दंडासह वीजबिलांची वसुली करण्यात येणार असून, बिल न भरल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील.

- Advertisement -

  कारवाई सुरु होताच काही वीजचोरांनी आपली दुकाने बंद करून पळ काढला. काही ठिकाणी जमावाने भरारी पथकांच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या मदतीने ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.


  ही कारवाई महावितरणच्या वीजचोरी प्रतिबंधक विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांच्या आदेशानुसार, उपसंचालक सुमीत कुमार आणि प्रभारी अधीक्षक अभियंता प्रताप मचिये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या कारवाईसाठी ठाणे, वाशी, कल्याण, नाशिक, अहिल्यानगर, पेण, पनवेल, वसई, विरार, पालघर, मालेगाव, जळगाव आणि धुळे येथून आलेल्या भरारी पथकातील अभियंते, तसेच शहर विभागातील २५ अभियंते आणि १०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.


  महावितरणने वीजचोरी रोखण्यासाठी अशा मोहिमा अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला असून, नागरिकांनी वीजचोरीपासून दूर राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -