धुळे दर्पण न्यूज :- धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटलेली असतानाही दरात अनपेक्षित घसरण झाली आहे. मागील आठवड्यापासून कांद्याचे दर प्रतिक्विंटल सुमारे २०० रुपयांनी कमी झाले असून, सध्या सरासरी दर ९९० रुपये क्विंटलपर्यंत खाली आला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
गेल्या आठवड्यापर्यंत बाजार समितीत कांद्याला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळत होता. त्यामुळे किरकोळ बाजारात कांदा २० ते २५ रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. मात्र, मागील आठ दिवसांपासून कांद्याची आवक घटलेली असूनही दर वाढण्याऐवजी घसरले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
बाजार समितीच्या माहितीनुसार, सध्या लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान दीडशे रुपये ते जास्तीत जास्त ११०० रुपये दर मिळत आहे. सरासरी दर ९९० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. पांढऱ्या कांद्याला तर केवळ ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. या घसरणीचा थेट परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येतो आहे. सध्या कांदा १२ ते १५ रुपये किलो दराने विकला जात आहे. काही ठिकाणी फक्त १०० रुपयांमध्ये ५ ते ६ किलो कांदा विक्रीस ठेवण्यात आला आहे.
![]() |
| - Advertisement - |
दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि मजुरीदेखील भरून निघत नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असून, सरकारने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
दुसरीकडे, कांद्याचे दर घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. अन्नपदार्थ महाग झालेल्या काळात कांद्याचे दर कमी झाल्यामुळे घरगुती बजेटवरचा ताण काहीसा हलका झाला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
शेतकऱ्यांची मागणी :
शेतकरी संघटनांनी राज्य शासनाकडे त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे. कांद्याच्या दरात स्थिरता आणण्यासाठी हस्तक्षेप करण्याची गरज असून, निर्यात धोरणात सुधारणा आणि शासकीय खरेदी यंत्रणा सक्रिय करण्याचे उपाय सुचवले जात आहेत.
सध्या निर्माण झालेली ही स्थिती केवळ शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुकसानकारक नाही, तर भविष्यात उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य धोरण राबवून शेतकऱ्यांना संरक्षण देणे काळाची गरज बनली आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


