धुळे दर्पण न्यूज :- “हम सेना के साथ”, “ऑपरेशन सिंदूर के साथ” अशा देशभक्तीपर घोषणांसह धुळ्यात सोमवारी, दिनांक १९ मे रोजी सकाळी ८ वाजता भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. 1,111 फुटी लांब तिरंगा घेऊन ही यात्रा अग्रसेन चौक येथून सुरू होऊन आग्रा रोडवरील गांधी पुतळ्यापर्यंत जाणार आहे. ही यात्रा संपूर्णतः अराजकीय असून सर्वपक्षीय, सर्वधर्मीय देशप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
आमदार अनुप अग्रवाल यांच्या आमदार कार्यालयात आज (शनिवारी) सकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी या तिरंगा यात्रेची सविस्तर माहिती दिली. आमदार अग्रवाल म्हणाले की, "जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच धर्म विचारून पर्यटकांची अतिरेक्यांकडून हत्या करण्यात आली. त्यानंतर भारतीय लष्कराने धाडसी 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ, हवाई अड्डे आणि ड्रोन यंत्रणा उद्ध्वस्त केली. या ऑपरेशनमुळे देशातील नागरिक आज सुरक्षित आहेत. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लष्कराला पाठिंबा दर्शवण्यासाठी धुळ्यात तिरंगा यात्रा काढली जात आहे."
![]() |
| - Advertisement - |
रॅलीचे वैशिष्ट्य :
– ही रॅली कुठल्याही पक्ष, धर्म किंवा जातीशी संबंधित नसून पूर्णपणे अराजकीय आहे.
– यामध्ये माजी व आजी सैनिक, युवक संघटना, विविध सामाजिक संस्था, शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी, व्यापारी वर्ग व सर्वसामान्य नागरिक सहभागी होणार आहेत.
– रॅलीमध्ये डी.जे.वर देशभक्तीपर गीते वाजवण्यात येणार आहेत.
– पोलिस बँडसह रॅलीचा सुरेख देखावा असेल.
– गांधी पुतळ्याजवळ तिरंग्याला अभिवादन करून समारोप होणार आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
प्रशासनाची परवानगी :
या रॅलीसंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व महापालिका यांना लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली असून आवश्यक सहकार्याची विनंती करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेस आमदार अनुप अग्रवाल यांच्यासोबत नवनिर्वाचित भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर सौ. जयश्री अहिरराव, ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, भिकन वराडे, ओमभैय्या खंडेलवाल, जितेंद्र चौवटीया, यशवंत येवलेकर, संदीप बैसाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
देशप्रेम दाखवायचंय तर या रॅलीत सहभागी व्हा – आ. अग्रवाल यांचे आवाहन
शूरवीर सैनिकांच्या पराक्रमाचा अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रॅली आहे. त्यामुळे ही फक्त एक यात्रा नाही, तर देशप्रेमाचा उत्सव आहे. धुळेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


